esakal | महाराष्ट्रात 'एसटी'ची आता हायटेक प्रवासी वाहतूक, व्हिटीएस प्रणालीचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

महाराष्ट्रात 'एसटी'ची आता हायटेक प्रवासी वाहतूक, व्हिटीएस प्रणालीचा शुभारंभ

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसेस आता हायटेक पद्धतीने राज्यभरात प्रवासी वाहतूक करणार आहे. प्रवाशांकरिता बसस्थानकावर प्रवासी माहिती (Bus Information) प्रणाली (टीव्ही संच) द्वारे बसेसची येण्याच्या व सुटण्याच्या वेळेची अद्यावत माहिती मिळणार आहे. त्यामुळे स्थानकावरील (Bus stop) चौकशी केंद्रावर जाऊन माहिती घेण्याची कटकट टळणार असून, प्रवाशांना (Travellers) त्यांच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहनांची माहिती (vehicle Information) उपलब्ध होणार आहे व त्यानुसार प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. ( Authentic Bus Information system by ST corporation To travelers )

मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथे अद्यावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, राज्यभरातील एसटीच्या वाहनांवर नियंत्रण निरीक्षण ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांना त्यांच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहनांची माहिती मोबाईलद्वारे सुद्धा बघता येणार आहे. तसे अप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महामंडळाच्या 30 विभागातील 250 आगारामध्ये 16 हजार 505 बसेसना व्हिटीएस यंत्र सध्या बसविण्यात आले असून, सुमारे 497 प्रवाशी माहिती प्रणाली संच एसटी डेपो स्थानकांवर बसविण्यात आल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

कशी असेल 'व्हीटीएस' यंत्रणा ?

- प्रत्येक स्थानकात याबाबत डिस्प्ले बोर्ड बसविण्यात येणार

- प्रवाशांना संबंधित बस कोणत्या भागात आहे? तिथे शेवटचे लोकेशन कोणते? समजणार

- एसटीचे वेळापत्रक सुधारण्यासाठी व्हीटीएस यंत्रणा फायदेशीर

- तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर लवकरच यंत्रणा कार्यान्वित होणार

प्रवाशांना होणार फायदा!

- बस सुटण्याची व पोहोचण्याची निश्चित वेळ प्रवाशांना समजणार

- अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास चालक, वाहकावर कारवाई करणे शक्य होणार

- चालक वेळकाढुपणा करीत असेल तर कारवाई करता येणार

एसटीची पारदर्शकता आणखी वाढणार

- बसचा अपघात झाल्यास तातडीने अपघातस्थळी मदत पोहोचविणे शक्य होणार

- एसटीचे वेळापत्रक सुधारून बसची सद्यस्थिती प्रवाशांना कळणार

- वाहक चालकावर नियंत्रण राहून एसटीची पारदर्शकता आणखी वाढणार

loading image