मुंबईत दररोज एक व्यक्ती 450 ते 450 ग्रॅम कचरा तयार करतो, 75 टक्के कचऱ्यात अन्न पदार्थांचा समावेश

मुंबईत दररोज एक व्यक्ती 450 ते 450 ग्रॅम कचरा तयार करतो, 75 टक्के कचऱ्यात अन्न पदार्थांचा समावेश

मुंबई - मुंबई पालिकेने 2019-20 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणातून असे आढळले आहे की, मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी 73 ते 75 टक्के कचरा हा फक्त अन्न पदार्थांच्या निगडीत असतो. पालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे. 6500 ते 6800 मेट्रिक टन कचरा हा मुंबईत तयार होतो. त्यातील जवळपास 73 टक्के कचऱ्यात अन्न-पदार्थांचा समावेश असतो. 

पालिकेच्या ईएसआर अहवालात असे दिसून आले आहे की, मुंबईच्या डंम्पिंग ग्राऊंडवर 2019 - 20 मध्ये नेण्यात आलेल्या कचऱ्यापैकी खाद्यपदार्थांचा कचरा 72.60 टक्के आहे. त्यामुळे, पालिकेच्या नियमानुसार ओला आणि सुका कचरा वेगळे करणे गरजेचे आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, हा कचरा डंम्पिंग ग्राउंडवरील बऱ्याच प्रमाणात जागा व्यापतो. त्यातून सतत आग लागण्याच्या घटना घडतात. 

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज एक व्यक्ती सरासरी 450-650 ग्रॅम इतका कचरा तयार करतो. कचरा व्यवस्थापन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर मुंबईत या कचऱ्याचा पुनर्वापर झाला तर ज्या कचऱ्याची वाहतूक डंम्पिंग ग्राऊंडमध्ये केली जाते त्याचे प्रमाण 93 टक्के कमी होऊ शकते. महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालात 2019-20 मध्ये वाळू, दगड आणि बांधकामाचा लगदा शहराच्या एकूण कचऱ्याच्या प्रमाणात 17.37 टक्के आहे. तर उर्वरित प्लास्टिक (3.24टक्के), लाकूड आणि कापडाचा सेंद्रिय कोरडा कचरा (3.51) टक्के, कागद आणि इतर पुनर्वापर (धातूंचा समावेश असलेला कचरा 3.28 टक्के एवढा आहे. )

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (एनईईआरआय) च्या अभ्यासानुसार ही आकडेवारी एकत्रित केली गेली आहे. आणि नागरिकांकडून निर्माण होणाऱ्या कचर्‍याच्या सरासरीची तुलना केली गेली. नागरी घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभागाने हा अहवाल एकत्रित केला होता.

मुंबई सारख्या शहरात कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची संकल्पना राबवली जात नाही. सुका, ओला, इलेक्ट्रॉनिक उपकरण, बायोमेडिकल, काचेच्या वस्तू, प्लास्टिक आणि थर्माकोल या सात श्रेणींमध्ये कचर्‍याचे विभाजन झाले पाहिजे. त्यासाठी वेगळी सात स्टोरेज सिस्टम पुरवल्या गेल्या पाहिजेत. जेणेकरुन त्या कचऱ्याची प्रभावीपणे विल्हेवाट किंवा पुनर्वापरासाठी सोपे होईल. तरीही, नागरिकांनी वारंवार आवाहन केले जात आहे की, ओल्या कचर्याची विल्हेवाट घरच्या घरीच करा. मात्र यावर्षी साथीच्या आजारामुळे ही परिस्थिती अधिक बिकट बनली आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

मुंबईतील कचऱ्याची परिस्थिती -

  • अन्न कचरा (सेंद्रीय ओला कचरा) - 72.60%
  • वाळू, दगड आणि बांधकामाचा लगदा - 17.37%
  • प्लास्टिक - 3.24%
  • लाकूड आणि कापड (सेंद्रीय सुका कचरा) - 3.51%
  • कागद आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य कचरा, धातूंचा समावेश - 3.28%

 2017-18 मध्ये शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण 9 हजार 400 मेट्रिक टन होता. तो आता 6500 ते 6800 मेट्रिक टनपर्यंत कमी झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. त्यापैकी 25 टक्के कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो तर उर्वरित 75 टक्के कचरा कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो.

( संपादन - सुमित बागुल )

on an average one mumbikar makes 450 grams of rubbish detail report on mumbai garbage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com