२०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडब्रेकर येण्याची शक्यता

२०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडब्रेकर येण्याची शक्यता

मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचा (NCB तपास 2019 पर्यंत मर्यादीत झाला आहे. त्यापूर्वीचा कॉल डिटेल्स मिळणे शक्य नसल्यामुळे 2019 पूर्वीच्या चॅटबद्दल पुरावे मिळवणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एनसीआरबीने याप्रकरणी अभिनेत्री दिपिका पदुकोणच्या चॅटबद्दलचा डाटा मिळवला आहे. तसेच  अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या चौकशीनंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात होते. त्यांच्या फोनमधील डाटा मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. ड्रग्स सेवनाच्या गुन्ह्यांतही पुरावा म्हणून ड्रग्स तस्करांसोबत झालेले संभाषण आणि पैशांचा व्यवहार हा संपूर्ण भाग मांडणे गरजेचे असते.

टेलिफोन कंपन्यांकडून सध्याच्या घडीला 2019 पर्यंतचाच कॉल डिलेल्स रेकॉर्ड मिळू शकतो. त्यामुळे जरी त्यापूर्वीचे चॅट हाती लागले. तरी संपूर्ण व्यवहाराची साखळी दाखवणे शक्य नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. याचप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्सचे पैसे क्रेडिटकार्डच्या सहाय्याने दिले होते. त्यामुळे ती संपूर्ण साखळी दाखवणे शक्य झाले. त्याच आधारावर रियाला अटक करण्यात आली. त्याचवेळी शोविक, मिरांडा यांचे कॉल डिलेल्स रेकॉर्डही सापडले. त्यामुळे तस्कर आणि या सर्वांमध्ये झालेले व्यवहार दाखवणे शक्य झाले. त्याच आधारावर ही अटक झाली.

अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या चौकशीनंतर त्यांचे मोबाइल फोनमधील डाटा मिळवण्याचे काम सुरू आहे. त्यासोबत या अभिनेत्रींनी दिलेले जबाब यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहेत. दोनही गुन्ह्यांत रिया एकमेव आरोपी आहे.

NCB दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहच्या बँक अकाऊंटमधून केलेल्या व्यवहारांचा तपास सुरु आहे. पहिली प्राथमिकता आतापर्यंतचे सर्व जबाबांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. यासोबतचे सर्व पेडलर्सचा जबाबही पुन्हा तपासण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब तपासण्यात येतील. निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल.

यामध्ये कॉल डिटेल्स, एसएमएस, WhatsApp चॅट या सर्वांचा तपास केला जाईल. त्याचप्रमाणे, जूना डंप डाटा तपासण्यात येईल. हे सर्व एवढे सोपे नाही. यामध्ये अधिक काळ लागू शकतो. सोबतचे यादरम्यान जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल असे एनसीबी अधिका-याने सांगितले. 

( संपादन - सुमित बागुल )

NCB investigation might face speed breaker due to limitation of getting call details before 2019 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com