esakal | दादर, कुर्ला टर्मिनसवर गर्दी रोखण्यासाठी रेल्वेकडून काटेकोर नियोजन

बोलून बातमी शोधा

kurla.jpg

परप्रांतीय निघाले गावाला

दादर, कुर्ला टर्मिनसवर गर्दी रोखण्यासाठी रेल्वेकडून काटेकोर नियोजन
sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई: राज्यभरात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे कडक लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे परप्रांतीय मजुरांच्या हाताला काम नसल्याने हजारोंच्या संख्येने मजुरांचे लोंढे दररोज मुंबईतून गावाकडे जाऊ लागले आहेत. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे सज्ज झाली आहे. रेल्वे पोलीस, आरपीएफ यांची पथके वाढविण्यात आली आहेत. 

मागील अनेक दिवसांपासून मुंबईतून परप्रांतीय मोठ्या संख्येने स्वगृही जात असल्याने सीएसएमटी, दादर, एलटीटी येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. कोरोना काळात या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोजना करण्यात आल्या आहेत. ज्या रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, तिथे  स्थानकावर आरपीएफ आणि रेल्वे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकिट आरक्षित आहे. याच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीवर रेल्वे प्रशासनाला नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
मुंबईसह उपनगरातून हजारो परप्रांतीय रेल्वेच्या माध्यमातून गावी जात आहेत.

मुंबईत 'वीकेंड लॉकडाऊन'मध्ये किती जणांवर झाली कारवाई?

अनेक रेल्वे गाड्यांची पुढील काही दिवसांची आरक्षित आसनांची क्षमता संपली आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी  विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे.  गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्वतः रेल्वे स्थानकावर जाऊन निरीक्षण करत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवाशांच्या गर्दीचे निरीक्षण केले. 

दिलासादायक! मुंबईत आज नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त 

प्रवाशांनी सामायिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडू नये, यासाठी रेल्वेकडून काळजी घेण्यात येत होती. रेल्वे स्थानकावर उद्घोषणाच्या माध्यमातून सामायिक अंतराचे नियम पाळण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे. याशिवाय ट्रेनने प्रवास करणार्‍यांची थर्मल स्क्रीनिंग केली जाते. त्यासाठी रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकात तैनात केले आहेत. त्यानंतर स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

(संपादन - दीनानाथ परब)