Ayodhya Verdict : निकाल देणाऱ्या घटनापीठातील 'हे' आहेत मराठी न्यायमूर्ती

सोनाली शिंदेसह गुरूप्रसाद जाधव आणि विशाल सवने, अयोध्या
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठात दोन मराठी  न्यायमूर्ती होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नाजीर यांचा समावेश होता. या पाच जणांपैकी न्या. शरद बोबडे आणि न्या. धनंजय चंद्रचूड हे मराठी आहेत.

विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होतायत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती शरद बोबडे हे सररन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारतील. ते देशाचे 47वे सरन्यायाधीश असतील

 न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 13 मे 2016 पासून सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्या आधी अलाहाबाद उच्च न्यायलयात मुख्य न्यायाधीश तर मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. खासगीपणाचा अधिकार हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार असल्याचा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठात त्यांचा समावेश होता.

न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडेही न्यायदानाच्या क्षेत्रातील समृद्ध वारसा आहे. शरद बोबडे यांचे आजोबा श्रीनिवास बोबडे हे ख्यातनाम वकील होते तर वडील अरविंद बोबडे हे राज्याचे दोन वेळा महाधिवक्ता होते. शरद बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालय तसंच मुंबई उच्च न्यायालयात अनेक प्रकरणांत यशस्वी युक्तिवाद केलाय. 29 मार्च 2000 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षांनंतर ते कायम न्यायमूर्ती झाले. 16 ऑक्टोबर 2012 रोजी ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. 12 एप्रिल 2013 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. आता ते लवकरच सरन्यायाधीश होतील. 

मराठी माणसानं आपल्या कार्यकर्तृत्व नेहमीच जगाच्या पाठीवर सिद्ध केलंय. आताही एक ऐतिहासिक आणि प्रदीर्घ चाललेल्या खटल्यात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय.

Webtitle : ayodhya verdict and two marathi chief justice of india 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya verdict and two marathi chief justice of India