
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट का रचण्यात आला होता हे शूटरने कबूल केल्याचे समोर आले आहे. त्याने पोलिसांना गँगस्टर अनमोल बिश्नोईचे नावही सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी २५ हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर 'दाऊद इब्राहिमशी संबंध आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग' यावरून हल्ला करण्याचे आदेश दिले होते. सिद्दीकीवर हल्ला करणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात हे सांगितले.