air pollution
air pollutionsakal media

नव्या वर्षात नवं टेन्शन; मुंबईतील हवा बिघडली!

माझगावातील हवा अतिशय वाईट, सातत्य कायम, 314 एक्यूआय हवेचा दर्जा

मुंबई : मुंबईत (Mumbai) नवीन वर्षाची सुरुवात (New year beginning) खराब हवेने (Air pollution) झाली आहे. पहिल्याच दिवशी माझगावातील हवेचा गुणवत्ता (Mazgaon air quality) निर्देशांक 314 एक्यूआय नोंदला गेला आहे. 2021 च्या शेवटच्या दिवशी ही मुंबईच्या हवेचा दर्जा अतिशय वाईट नोंदवण्यात आला होता. (Bad air quality in Mumbai mazgaon in new year 2022 beginning)

air pollution
परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

मात्र, वर्षाची सुरुवात ही खराब हवेने झाली आहे. संपूर्ण मुंबईच्या हवेची गुणवत्ता  200 एक्यूआय नोंदवली गेली, जी मध्यम प्रकारात येते. तज्ज्ञांच्या मते पुढील दोन ते तीन दिवस मुंबईची हवेची गुणवत्ता अशीच खराब राहील. मुंबईतील वातावरणात चढ-उतार होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात थंडी असते त्यानंतर पुन्हा दुपारी उनाच्या झळा सोसाव्या लागतात. यातुन सर्दी आणि खोकला असे आजार उद्भवत आहेत. 

वायु गुणवत्ता व हवामान अंदाज आणि संशोधन (सफर) च्या हवामानानुसार, शनिवारी मुंबईची एअर क्वालिटी 200 एक्यूआय नोंदली गेली, जी 'मध्यम' प्रकारात येते. मुंबईची हवेची गुणवत्ता ढासळली असून घातक सुक्ष्मकणांचे प्रमाण वाढले असल्याची चिंता सध्या व्यक्त केली आहे. हवेचा स्तर बराच खालावल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी सुरु असलेली इमारतींची कामे, अनेक ठिकाणी सुरु असलेल्या  पायाभूत सुविधांशी निगडीत प्रकल्पापासून उठणारी प्रचंड धूळ, वाहनांतून निघणारा धूर, अशा अनेक घटकांमुळे मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने कमालीची भर पडली आहे.

सफरचे संचालक गुफरान बेग यांनी सांगितले की, मुंबईत सध्या थंडी पडत आहे, त्यामुळे हवेत असलेले कण वातावरणात साचून राहतात. हेच कारण आहे की हवेत उपस्थित प्रदूषक बाहेर पडत नाहीत. माझगावातील हवा सर्वाधिक प्रदूषित आहे.

या भागात सर्वाधिक प्रदूषण

मुंबईच्या विविध भागात हवेची पातळी वाईट होती. कुलाब्यात 256, माझगावमध्ये 314, मालाडमध्ये 309 ऐक्यूआय नोंदवले गेली आहे.

air pollution
गर्भवती, स्तनदा अन् मुलांना घरपोच आहार

संपूर्ण मुंबई शहर  200 एक्यूआय

भांडूप 116 एक्यूआय

कुलाबा 256 एक्यूआय

मालाड 309 एक्यूआय

माझगाव 314 एक्यूआय

वरळी 108 एक्यूआय

बोरीवली 132 एक्यूआय

चेंबूर 149 एक्यूआय

अंधेरी 139 एक्यूआय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com