परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी I Parel Hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

राज्यात विनयभंगाच्या प्रकरणात मोठी वाढ झालीय.

परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

राज्यात विनयभंगाच्या प्रकरणात मोठी वाढ झालीय. परळच्या केईएम रुग्णालयात (Parel KEM Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून अनोळखी व्यक्तीविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात (Bhoiwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईवर परळच्या केईएम रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री पीडित मुलगी ही जुनी ओपीडी क्र. १०१ येथे मागील ड्रेसिंग विभागाजवळ उभी असताना अनोळखी व्यक्तीनं तिला मागून येऊन मिठी मारत अश्लील शेरेबाजी केली.

हेही वाचा: Happy New Year : 2022 मध्ये देशातील 'या' 5 मोठ्या समस्या सुटतील?

यावेळी घाबरलेल्या मुलीनं आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत, वार्डच्या दिशेनं मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी सीसीटिव्ही नसल्यानं आरोपीची अद्याप ओळख पटलेली नसून भोईवाडा पोलिस (Bhoiwada Police) आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: North Korea : नवीन वर्षात हुकूमशहा Kim Jong Un सुधारणार?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime News
loading image
go to top