स्वछता मानांकनात वरच्या स्थानावर असलेल्या रंगीबेरंगी किंग्ज सर्कलचा उडाला रंग

स्वछता मानांकनात वरच्या स्थानावर असलेल्या रंगीबेरंगी किंग्ज सर्कलचा उडाला रंग
Updated on

मुंबई, ता. 18 : सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला, स्वच्छतेमध्ये वरच्या स्थानकावर असलेल्या हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकाचा आता रंग उडत चालला आहे. स्थानकावरील बाकडे दुरावस्थेत आहेत. त्यामुळे या स्थानकाला भकास रूप प्राप्त होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकाकडे लक्ष देऊन स्थानकाची सातत्याने देखभाल ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ च्या झोनल रँकिंगच्या सर्वेक्षणानुसार उपनगरी असलेल्या स्थानक (एसजी) मध्ये किंग्ज सर्कल स्थानकाने आठव्या क्रमांकावर पटकाविला होता. तर, एसजी २’ या विभागात किंग्ज सर्कलने दुसरा क्रमांक पटकाविला होता. किंग्ज सर्कल स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि महसूल यावरून त्याने दुसरा क्रमांक पटकाविला. मात्र किंग्ज सर्कल स्थानक आता पुन्हा भकास स्थानक झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. 

देखभाल न केल्याने स्थानकावरील रंग उडत चालला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी एस. के. पारेख यांनी दिली. पूर्वी किंग्ज सर्कल या स्थानकावर एन. के. सिन्हा हे स्थानक प्रबंधक होते. त्यांनी या स्थानकाचे रुपडे पालटले होते. मात्र आता या स्थानकाची दुरवस्था झाली आहे. किंग्ज सर्कल स्थानकाजवळील सुंदर बगीच्याचे रूपांतर जंगलात झाले आहे. प्रशासने या स्थानकाकडे लक्ष देऊन किंग्ज सर्कल स्थानक पुन्हा चमकविले पाहिजे म्हणजे पुढील सर्व्हेक्षणात किंग्ज सर्कलचे नाव उच्च स्थानी येईल, असे प्रवासी राजेश असरानी यांनी दिली. 

bad condition of one of the best harbor stations in mumbai kings circle looks ruined

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com