हापूस प्रेमींसाठी वाईट बातमी, यंदा हापूस...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

आधी रेंगाळलेला पाऊस आणि आता उशिराने आलेला हिवाळा. याचा थेट परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होताना पाहायला मिळतोय. विपरीत हवामानामुळे यंदा वाशी बाजारात पोहोचणारा फळांचा राजा आंबा उशिराने बाजारात येणार आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये नोव्हेंबरमध्येच हापूसची पहिली पेटी नवी मुंबईच्या वाशी बाजारात दाखल झाली होती. 

आधी रेंगाळलेला पाऊस आणि आता उशिराने आलेला हिवाळा. याचा थेट परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होताना पाहायला मिळतोय. विपरीत हवामानामुळे यंदा वाशी बाजारात पोहोचणारा फळांचा राजा आंबा उशिराने बाजारात येणार आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये नोव्हेंबरमध्येच हापूसची पहिली पेटी नवी मुंबईच्या वाशी बाजारात दाखल झाली होती. 

महत्त्वाची बातमी :  राहुल गांधी यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने उचललं 'हे' पाऊल.. 

यंदा कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या प्रमुख जिल्ह्यातील हापूस आंब्याच्या झाडांना फार उशिराने मोहोर आलाय. कोकणातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उशिरापर्यंत रेंगाळलेल्या पावसामुळे यंदाच्या आंबे उत्पादनावर परिणाम झालाय. वाढीव पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही आंबा शेतकऱ्यांनी सांगितलंय. उशिरापर्यंत रेंगाळलेल्या पावसानंतर उशिराने आलेल्या थंडीमुळे झाडांवर मोहोर उशिराने आला आणि आता फळधारणा देखील उशिराने सुरु झाली आहे. त्यामुळे आंबा तयार होण्यास विलंब होणार आहे.   

हेही वाचा :  मोदी सरकार आणणार #WhatsApp पेक्षा सुरक्षित मेसेजिंग App, हे आहे नाव..

सावंतवाडीमधल्या एका आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार अनियमित मान्सून आणि उशिराने पडलेल्या थंडीचा प्रभाव आंबा उत्पादनावर पडलाय. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं जवळ जवळ 20 ते 25 टक्के नुकसान होणार होवू शकतं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये साधारणतः  अडीच लाख हेक्टरवर आंबा उत्पादन केलं जातं. जानेवारी महिन्यात आंबा उत्पादनासाठी हवामान अनुकूल राहिलं तर उत्पादनात 20 ते 25 टक्के नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय

वाशी मार्केटमधील एका हापूस विक्रेत्याच्या मते सर्व काही ठीकठाक राहिलं तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हापूसची पहिली पेटी वाशी बाजारात दाखल होऊ शकते. हापूस च्या नावावर त्याच्याच सारखा दिसणारा कर्नाटकी किंवा दक्षिण भारतातील आंब्याची आवकही होऊ शकते. दक्षिणात्य नकली हापूस सोबतच अफिर्केतून देखील आता आंब्यांची आवक सुरु झालीये. 

WebTitlle : bad news for all Alphonso lovers :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad news for all Alphonso lovers