राहुल गांधी यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने उचललं 'हे' पाऊल

राहुल गांधी यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने उचललं 'हे' पाऊल

मुंबई : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. विलेपार्लेतील शिवसैनिकांनी राहुल गांधी यांना 'माझी जन्मठेप' हे पुस्तक भेट दिलं. राहुल गांधी यांना सावरकर समजणे महत्वाचे असल्याने त्यांना हे पुस्तक भेट देण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शिवसेना-कॉंग्रेस मधील संबंध ताणले जाण्याची शक्‍यता आहे. 

कॉंग्रेस पक्षातर्फे दिल्लीत शनिवारी भारत बचाव रॅलीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं. 'माझं नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही.मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही' असं वक्तव्य केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे सावरकर प्रेमींकडून विरोध होत आहे.

शिवसेना जरी महाविकास आघाडीचा घटक असली तरी शिवसैनिकांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांना सावरकर समजावे म्हणून सावरकरांचे "माझी जन्मठेप" हे पुस्तक जलद टपालाने विलेपार्ले पूर्व नेहरू रोड येथील पोस्ट कार्यालयातून सावरकर प्रेमी विलेपार्लेतील शिवसेनेचे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र जाणावळे यांनी पाठवले. 

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर हे अखंड हिंदू देशाचे दैवत आहेत. त्यांच्या विरोधातील राहुल गांधी यांचं वक्तव्य आमच्या मनाला लागलं. आम्ही सावरकर प्रेमींनी सावरकरांचा त्याग त्यांची तळमळ समजावी. संजय शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही सावरकरांना समजून घेण्याचा सल्ला राहुल यांना दिला आहे. यानुसार आम्ही हे पुस्तक राहुल त्यांना असून त्यांनी वेळ काढून हे पुस्तक जरूर वाचावं आणि सावरकर काय आहेत हे समजावं तसेच त्यांनी यापुढे सारवकरांविषयी आदराने वागावे असा सल्ला ही जाणावळे यांनी दिला. पुस्तक वाचल्यावर राहुल गांधी स्वतः लोकसभेत सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करतील अस ते पुढे म्हणाले. 

महाविकास आघाडीपेक्षा सावरकर आम्हाला प्रिय आहेत.सावकरांविषयी कोणतीही तडजोड आम्ही करणारा नाही.आम्ही जरी महाविकास आघाडीमध्ये असलो तरी त्याचा अर्थ सावरकरांचा अपमान सहन करणे असा होत नाही.राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आम्हा शिवसैनिकांचं मन दुखावलं असून त्यांनी सावरकर समजून घ्यावे असं आवाहन आम्ही करीत आहोत. 

WebTitle : after rahul gandhis controversial statement on savarkar this is reaction of shivsena 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com