'रात्रीस खेळ चाले', दिवसा रस्ता उखडे.. 

'रात्रीस खेळ चाले', दिवसा रस्ता उखडे.. 

सफाळे पश्चिमेला असलेल्या विराथन गावात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवासी व स्थानिक नागरीक रस्त्यातील खड्ड्यांमुळे बेजार झाले होते. या विराथन रस्त्याचे प्रलंबित काम रात्र दि. 30 डिसेंबर रोजी रात्री दहा नंतर अचानक सुरू झाले. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने सर्वांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

हे काम तात्पुरते केल्याचे दिसत असून ते इतके निकृष्ठ दर्जाचे आहे की पायाने सुद्धा खडी निघून जात आहे, असे धनेश गावड यांनी म्हटले आहे. या रस्त्यावर 18 बाईक स्लिप झाल्या असून हनाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे शरद घरत यांनी म्हटले आहे.

विराथन गावातील 3 किमी लांबीचा रस्ता एकाच रात्री बनवण्यासाठी घेतल्याने अत्यंत घाईघाईने काम सुरू झाले. सकाळी 8 नंतर हाच रस्ता उखडायला लागला. संबंधीत अधिकारी ठेकेदार (दि.1) तारखेला पाहणीसाठी आले तेव्हा विटी लाईनच्या गावकऱ्यांनी यांना घेराव घातला.

ठेकेदार मधुकर पाटील, घोलप व अभियंता महेंद्र किणी यांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून ठेकेदार व अभियंत्याची खरडपट्टी काढली. केलेले काम खूपच खराब असल्याचे या तिघांनी कबुल केले सर्वांनी ग्रामस्थांची माफी मागितली. या तिघांना रात्री केलेला रस्ता पुन्हा करायला लावला आणि गुरुवार (दि.2) तारखेला नवीन कामाला सुरुवातही झाली.

या वेळी भावना किणी, शरद घरत, गणेश भोईर, सुधीर पाटील यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी हस्तक्षेप केला.

Webtitle : bad roads of are finally repaired after citizens agitation in safale village of mumbai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com