
बदलापूर : मे महिन्यापासून सुरू झालेला पावसाने चांगलाच जोर धरल्यावर, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील हा जोर कायम राहिल्यामुळे, बदलापूर जवळील बारवी धरणात २५ जुलैपर्यंत एकूण ८३ टक्के इतका पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारल्याने त्याचा परिणाम हा बारवी धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यात झाला. कारण धरणातील पाणीसाठा त्यामुळे मंदावला.