

Female Egg Trafficking
ESakal
बदलापूर : बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असून, तपासाची व्याप्ती आता थेट नाशिकपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात नाशिकच्या आयव्हीएफ सेंटरशी संबंधित डॉ. अमोल पाटील याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या शक्यतेने तपास अधिक गतिमान झाला आहे.