

Badlapur Female Sperm Production Racket
ESakal
बदलापूर : बदलापुरात एका धक्कादायक आणि संवेदनशील प्रकरणाचा उलगडा झाला आहे. एका महिलेच्या निवासस्थानी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक व बदलापूर पूर्व पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या छापेमारीत इंजेक्शन व वैद्यकीय औषधांचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी तीन महिलांना शनिवारी (ता. २१) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.