
Railway Passengers Protest over Train Delays
मोहिनी जाधव
बदलापूर : संपूर्ण आठवडाभर लोकल उशिराने धावत असल्यामुळे बदलापूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारपासून सुरू झालेला लोकल विलंबाचा हा त्रास गुरुवारी (ता. १६) पाचव्या दिवशीही कायम राहिल्याने बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रेल्वे प्रशासन लेखी आणि तोंडी तक्रारींची दखल घेत नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.