Badlapur School Crime: सीसीटीव्ही होते पण बंद होते, दीपक केसरकरांनी सांगितलं शाळा कुठे-कुठे कमी पडली

education minister Deepak Kesarkar: एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे बदलापूरकरांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Badlapur School Crime: सीसीटीव्ही होते पण बंद होते, दीपक केसरकरांनी सांगितलं शाळा कुठे-कुठे कमी पडली
Updated on

मुंबई- एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे बदलापूरकरांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे.

बेलापूरमधला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. हे आज सकाळी कळाल्यानंतर मी मिटिंग बोलावली होती. सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेमध्ये असावे असे आदेश दिले होते. ही समिती शाळेत होती की नाही याची सध्या माहिती नाही. पण ते तपासलं जाणार आहे, असं केसरकर म्हणाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com