esakal | बदलापूरच्या युवकाला फिलिपाईन्समध्ये डांबले!
sakal

बोलून बातमी शोधा

बेपत्ता इरफानचा फोटो दाखवताना पालक.

मुलाला मायदेशात परत आणण्यासाठीच्या पालकांच्या आठ वर्षांच्या संघर्षाला अपयश

बदलापूरच्या युवकाला फिलिपाईन्समध्ये डांबले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आठ वर्षांपूर्वी विदेशात नोकरीसाठी गेलेल्या युवकाला फिलिपाइन्समध्ये डांबून ठेवल्याची तक्रार युवकाच्या पालकांनी केली आहे. आठ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एकुलत्या एक मुलाला मायदेशी आणण्यासाठीच्या संघर्षाला अद्याप यश मिळाले नसल्याची खंत बेपत्ता युवकाच्या पालकांनी अंबरनाथ येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मूळचा सोलापूरचा रहिवासी असलेला आणि सध्या बदलापुरात वास्तव्यास असलेला शेख मोहम्मद इरफान अब्दूल हा तरुण नोकरीसाठी सौदी अरबियात गेला होता. तेथे झामील एअर कंडिशनर्स या कंपनीत २०११ ते २०१३ पर्यंत काम केल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या फिलिपाईन्सच्या तरुणीने इरफानला फिलिपाईन्सला नेले; मात्र त्याबाबत इरफानने घरी काहीच कळवले नाही.

इरफानसोबत संपर्क होत नसल्याने सौदी अरेबियातील ज्या कंपनीत तो कामाला होता तेथे संपर्क केला असता त्यांनी तो काम सोडून निघून गेल्याचे सांगितले. दरम्यान इरफानच्या बहिणीने फेसबुकवरून इरफानचा शोध घेण्याचा प्रयत्न करत त्यावरून मेसेज पाठवित इरफानला संपर्क केला. त्यावर इरफानने फोन करत, मी अडचणीत आहे, असे सांगून पुढे बोलण्याचा प्रयत्न केला असता इरफानचा फोन कट करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले. चौकशीनंतर तो नंबर फिलिपाईन्सचा असल्याचे समोर आले.

इरफान फिलिपाईन्सला अडचणीत आहे. त्याला पुन्हा बोलण्यासाठी संधी दिली गेली नसून फेसबुकवरही त्याचा संपर्क तुटला. ज्या मुलीसोबत फिलिपाईन्स देशात गेला, तिनेच त्याला डांबून ठेवल्याचा संशय वडील अब्दुल शेख यांनी व्यक्त केला आहे.

सरकारदरबारी तक्रारीनंतरही दखल नाही
फिलिपाईन्स देशात अडचणीत असल्याची तक्रार अब्दुल शेख यांनी सरकारदरबारी केली. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यानंतर सुषमा स्वराज यांच्याकडेही 
केली. परराष्ट्र मंत्रालयातील प्रत्येक विभागात तक्रार करूनही  त्यांच्या तक्रारीची अद्याप दखल घेतलेली नाही, असेही शेख यांनी सांगितले.

loading image
go to top