गोळीबारप्रकरणी ...या नेत्याच्या भावाला अटक; जिल्ह्यात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

मरण तर कोठेही येईल, मरणाची भीती कशाला, आम्ही येथेच स्वच्छतेची व आरोग्याची काळजी घेत आहोत; मात्र काही केल्या आम्ही आंदोलन मागे घेणार नाही किंवा तहकूबही करणार नाही, असा निर्धार नागपाडा येथे आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलांनी व्यक्त केला आहे.

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डिसेंबर महिन्यात सायलेंट रिसॉर्टसमोर मुंबईकडे जाणाऱ्या व्यावसायिकाच्या कारवर दुचाकी स्वाराने गोळीबार केला होता. हा दुचाकीस्वार मुंबईच्या दिशेने पळून गेला होता. या प्रकरणात यशस्वी तपास करून मनोर पोलिसांनी बहुजन विकास आघाडीचे नेते प्रवीण राऊत यांचा भाऊ संतोष राऊत याला अटक केली.

हेही वाचा- शाब्बास इंडिया! जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतूक... 

मुंबईचे रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिक सुजित पाटकर हे त्यांच्या कारने ११ डिसेंबरला व्यवसायानिमित्त पालघरला आले होते. काम आटोपून सायंकाळच्या सुमारास मुंबईला जात असताना, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सायलेंट हॉटेलसमोर त्यांना अज्ञात दुचाकीस्वाराने अडवले होते. त्यानंतर खिशातील बंदूक काढून त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या. प्रसंगावधान राखत पाटकर यांनी कारचा वेग वाढवून गोळी चुकवली. 

हेही वाचा- बनावट सॅनिटायझरमुळे राज्यभरात एफडीएचे छापासत्र

पाटकर हे व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आणि गुंतवणूकदार असून, याआधीही त्यांच्यावर मुंबईच्या वाकोला परिसरात गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारामागे व्यावसायिक वादाच्या पार्श्वभूमी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात येत होता. सोमवारी (ता.१६) दुपारी या प्रकरणी मनोर पोलिसांनी सफाळ्यातून संतोष राऊत यांना अटक केली. बहुजन विकास आघाडीचे नेते प्रवीण राऊत यांना महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली असून, त्यांच्या भावाला गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ 
उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bahujan vikas aaghadi Pravin Raut's brother arrested for firing