
वसई: बहुजन विकास आघाडीचे तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीने काबीज केल्यावर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. अशातच बविआचे माजी नगरसेवक छोटू आनंद हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी बविआची साथ सोडली, अशा चर्चेला उधाण आले आहे.