

Bhagat Singh: नायक राखेतून जन्म घेतात' असे म्हटले जाते.अभिजित भालेराव यांनी 'मॅन हू एव्हेंज्ड भगतसिंग' या पुस्तकातून बैकुंठ शुक्ला नावाच्या अशाच एका नायकाची व्यक्तीरेखा जिंवत केली आहे.भगतसिंग, बैकुंठ शुक्ला हे पडद्यावरचे नव्हे तर देशाचे खरेखुरे नायक आहे. असे गौरवउद्गार अभिनेता करण ओबेरॉय यांनी काढले.पेग्विनकडून काढलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता.१४) मुंबईतील इरॉस सभागृहात पार पडला.
प्रकाशन सोहळ्याला पटकथा लेखक हृषी विरमनी, उद्योजक व लेखक प्रफुल्ल वानखेडे, अभिनेता -दिग्दर्शक करण ओबेरॉय यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रकाशनाच्या निमीत्ताने एक परिसंवादही झाला.अर्जुन हेमाडी यांनी सुत्रसंचालन केलेल्या या परिसंवादातून या पुस्तक निर्मीतीचा प्रवासासोबत भगतसिंगाच्या आयुष्यावरच्या विविध पैलूवर चर्चा झाली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वोच्च बलीदान देणाऱ्या शहिद भगतसिंग यांना देशाने आपल्या हृदयात स्थान दिले आहे.भगतसिंग यांच्या फाशीने पेटून उठलेल्या असंख्य तरुणांनी या फाशीचा बदला घेण्याचे प्रयत्न केले.अशाच एका असफल प्रयत्नात बिहारमधील तरुण शिक्षक बैकुंठ शुक्ला यांना फासावर जावे लागले. विस्मरणात गेलेल्या या तरुण क्रांतीकारकाचा प्रवास लेखक अभिजित भालेराव यांनी 'मॅन हू एव्हेंज्ड भगतसिंग' या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणला आहे.
शहिद बैकुठ शुक्ला यांच्या खटल्याचे वृत्तांत सोडल्यास त्यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नव्हती. भगतसिंगासाठी हसत हसत फासावर चढणाऱ्या या नायकाला आपण ओळखत नाही.याचे एक देश म्हणून अत्यंत वाईट वाटले असे लेखक अभिजित भालेराव यांनी सांगीतले.
शुक्ला यांचे वंशजाची उपस्थिती
या प्रकाशन सोहळ्याला शहिद बैकुंठ शुक्ला यांचे वंशज आवर्जुन उपस्थित होते. संपुर्ण देश आणि बिहारने या तरुण क्रांतीकारकाला विस्मरणात टाकले मात्र महाराष्ट्रातील एका लेखकाने आमच्या आजोबाची दखल घेतली. हे आम्ही कधीच विसरु शकत नाही. अशा भावना यावेळी शुक्ला यांच्या वंशजानी व्यक्त केल्या. भगतसिंगाप्रमाणे बैकुठ शुक्ला यांच्या तरुण पत्नीने सुटकेसाठी माफीची याचिका करण्यास नकार दिला होता. आयुष्यभर त्या ताठ मानेने जगल्या.२००४ मध्ये त्यांचे निधन झाल्याचे वंशजाकडून सांगण्यात आले.
आजचा तरुण पुस्तक वाचत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल.पुणे बुक फेअर,चैत्यभूमीवर झालेली कोट्यवधीच्या पुस्तकांची विक्रीचा काय अर्थ आहे.तरुणाला वाचनाची आवड आहे. मात्र त्याला समजेल अशा पध्दतीचे आणि त्यांच्या फॉर्मॅटमध्ये पुस्तके देण्याची जबाबदारी लेखकांची आहे.
प्रफुल्ल वानखेडे, लेखक
देशासाठी फासावर जाणाऱ्या शहिदांच्या व्यक्तिमत्वाने आपल्याला प्रेरणा मिळते.अशा व्यक्तीरेखांना जिवंत करणे आव्हात्मक काम आहे.लेखकाने ते करुन दाखवले.
हृषी विरमनी,पटकथा लेखक
जिंवतपणी भगतसिंग यांची लोकप्रियता महात्मा गांधींच्या पुढे गेली होती असे के राजगोपालचारी यांनी नमूद करुन ठेवले होते.आजही भगतसिंग यांचे जीवन कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देते.
अभिजित भालेराव, लेखक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.