Bhagat Singh Birth Anniversary : महात्मा गांधी भगतसिंगांची फाशी खरोखरचं थांबवू शकले असते का?

भगतसिंग यांच्या फाशीपूर्वी आणि नंतर महात्मा गांधींवर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले
Bhagat Singh Birth Anniversary
Bhagat Singh Birth Anniversary esakal
Updated on

Bhagat Singh Birth Anniversary : भगतसिंग यांच्या फाशीपूर्वी आणि नंतर महात्मा गांधींवर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले. जनतेच्या मोठ्या वर्गातून असं म्हटलं जात होतं की गांधी हे एकमेव व्यक्ती होते ज्यांच्या प्रभावामुळे ही फाशी थांबू शकली असती.

गांधी गो बॅकच्या घोषणांचा गजर झाला. संतप्त तरुण त्यांना काळे झेंडे दाखवत होते. लोक 'भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु अमर रहे' अशा घोषणा देत होते. महात्मा गांधींमुळे त्यांची फाशी टळली असती असं म्हटलं जात होतं. नाराजी शिगेला पोहोचली होती. काँग्रेसच्या कराची परिषदेचं हे दृश्य होतं. परिषदेच्या तीन दिवस आधी म्हणजे 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी सरदार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली.

Bhagat Singh Birth Anniversary
Walnuts For Health : म्हातारपणी अंग दुखतंय म्हणून विव्हळत बसायचं नसेल तर आत्ताच अक्रोड खायला सुरू करा

भगतसिंगांना फाशी देण्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळी महात्मा गांधी कराची (सध्याचे पाकिस्तान) जवळील मालीर स्टेशनवर पोहचले. तेव्हा लाल रंगाचे कपडे घातलेल्या भारत सभेच्या त्या तरुणांनी महात्मा गांधींना काळ्या कपड्यापासून तयार केलेली काळी फुले दिली. काळे झेंडे दाखवले.

Bhagat Singh Birth Anniversary
Mental Health: तुमच्या वर्तनाचे मानसिकतेवरही होतात परिणाम?

या प्रसंगाचे वर्णन खुद्द महात्मा गांधींनीच केले आहे. ते म्हणतात, मला दिलेली ती काळ्या कपड्यांची फुले ही तीन युवकांनी पत्करलेल्या हौतात्म्यनंतरच्या अंत्यसंस्काराची ती राख होती. या घटनेबाबत मी बदल घडवून आणू शकलो नाही आणि त्यामुळेच तरुणांनी माझ्यावर राग व्यक्त केला. त्याही पुढे जाऊन ते सांगतात की, तरुणांनी ठरवले असते तर ते माझ्यावर फुलांचा वर्षावही करु शकले असते किंवा तिच फुले त्यांनी फेकूनही मला मारली असती.

Bhagat Singh Birth Anniversary
Colon Health : कोलनमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडत नाहीय? जाणून घ्या सोपे उपाय व फायदे

पण यातील एकही गोष्ट या तरुणांनी केली नाही. त्यांनी शांतपणे माझ्या हातात ती फुले दिली. त्यांनी यावेळी घोषणाही दिल्या की, गांधीवाद नष्ट होऊ देत आणि गांधी गो बॅक. या घोषणा आणि ती काळी फुले हीच त्यांच्या रागाची खरी प्रतिकं होती असं गांधी लिहून ठेवतात.गांधी-आयर्विन करारात फाशी रद्द करण्याची अट ठेवण्याची बोस यांची इच्छा होती.

Bhagat Singh Birth Anniversary
Health Tips : घरातला हा एक मसाला तुमची सांधेदुखीची कायमची सुट्टी करेल, लगेच करा हा प्रयोग

फाशीच्या आधी आणि नंतर महात्मा गांधींवर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले. काँग्रेसच्या आणि जनतेच्या मोठ्या वर्गातून तक्रारी होत्या की गांधी हे एकमेव व्यक्ती होते ज्यांच्या प्रभावामुळे ही फाशी थांबू शकली असती. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी भगतसिंग, सुखदेव आणि राज गुरू यांना फाशी देण्याचा निर्णय मागे घेऊन व्हॉईसरॉय आयर्विन यांच्याशी करार करण्याच्या अटीचा समावेश करावा, अशी मागणी केली होती.

Bhagat Singh Birth Anniversary
Monsoon Travelling Tips : या टिप्स वाचा मगच पावसाळ्यात ट्रिपला जा!, पुन्हा म्हणू नका आधी सांगितलं नाही?

बोस म्हणाले, "जर व्हाईसरॉय तयार नसेल तर चर्चा अजिबात होऊ नये किंवा करार मोडला जावा."गांधींचे प्रयत्न अर्धवट होते का?गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा 17 फेब्रुवारी पासून सुरू होऊन 5 मार्च 1931 ला पूर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला.त्यावेळी देखील भगत सिंहच्या माफीवर चर्चा झाली. या करारादरम्यान गांधीजींनी 90 हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली. हा प्रसंग अजय देवगण याच्या ‘दि लेजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटात खूप चपखलपणे दर्शविला आहे, जो वास्तवाशी जवळीक असणारा टिपला आहे.

Bhagat Singh Birth Anniversary
Monsoon Travelling Tips : या टिप्स वाचा मगच पावसाळ्यात ट्रिपला जा!, पुन्हा म्हणू नका आधी सांगितलं नाही?

याच अनुषंगाने 22 मार्चला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंगच्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.गांधीजींनी 23 मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिलं आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली.हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता तिघांना फाशी दिली. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही.

Bhagat Singh Birth Anniversary
Vidarbha Travels Burned : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

महात्मा गांधी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी टाळण्यासाठी आग्रही होते. आयर्विन यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट ला पाठवलेल्या अहवालात महात्मा गांधी यांच्यासोबत केलेल्या या चर्चेचा उल्लेख केला आहे. महात्मा गांधी हे अहिंसा तत्व मानतात. त्यामुळे कुणाचाही जीव जावा याच्या विरोधात ते आहे. त्यावेळी लोक महात्मा गांधींवर टीका करू लागले की महात्मा गांधी यांनी या तिघांची फाशी माफ करण्याऐवजी ती पुढे ढकला असे का म्हणत आहेत.

Bhagat Singh Birth Anniversary
Adventure Travel Tips : Cycle सोलो ट्रिप प्लॅन करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

त्यांनी ही शिक्षा माफ करण्यावरच जोर दिला पाहिजे. मात्र ही बाब खरंच शक्य होती का? भगत सिंग यांच्यावर सँडर्सची हत्या केल्याचा आऱोप होता. त्यांची फाशी माफ करून इंग्रज खून केला तरीही माफी देतात हा संदेश देशात पोहचवणं शक्य नव्हतं. तो काळ हा गुलामगिरीचा काळ होता. या तिघांनीही इंग्रजांच्या राजवटीविरोधा शस्त्र उचललं होतं त्यामुळे इंग्रज त्यांना माफ करतील हे अशक्यप्रायच होतं.

Bhagat Singh Birth Anniversary
Travel Packing Tips : लाँग वीकेंडचा प्लॅन असेल तर इतरांपेक्षा या पॅकिंग टिप्स तुमची जास्त मदत करतील

व्हॉईसरॉय आयर्विन यांच्यासमोर महात्मा गांधी यांनी हाच मुद्दा 19 मार्च 1931 लाही उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी इरविन यांनी हे स्पष्ट केलं की तिघांचीही फाशी माफ करण्यासाखी कोणतीही परिस्थिती नाही. 19 मार्चला फाशीची तारीखही जाहीर झाली होती त्यामुळे ती आणखी पुढे ढकलण्याचाही काही प्रश्न उद्भवणार नाही असंही इरविन यांनी महात्मा गांधींना सांगितलं.

Bhagat Singh Birth Anniversary
Travels Ticket : तिकीट दरवाढीचे ‘विघ्न’; ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केले दुप्पट भाडे

अशा सगळ्या घडामोडी घडूनही महात्मा गांधी यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी आसिफ अली यांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची भेट घेण्यासाठी पाठवलं. तुम्ही तिघे हिंसेचा मार्ग सोडून द्या हे वचन त्यांच्याकडून घेऊन या असा निरोप घेऊन आसिफ अली यांना महात्मा गांधी यांनी पाठवलं होतं. जर असं वचन या तिघांनीही दिलं असतं तर या तिघांची फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी काहीतरी करू शकू असं महात्मा गांधींना वाटत होतं.

Bhagat Singh Birth Anniversary
Travel Gadgets : फिरायला जाताय? सोबत ठेवा हे महत्त्वाचे गॅजेट्स! प्रवास होईल आरामदायक

भगतसिंग ही त्यांच्या भूमिकेवर ठाम

भगतसिंगांना फाशी झाल्यानंतर कानपूरमध्ये भीषण दंगल उसळली. महात्मा गांधींना वृत्तपत्रातून आलेल्या बातमीतून समजतं की, भगतसिंगांच्या फाशीनंतर कानपूरमधील हिंदू पेटून उठले आहेत. आणि भगतसिंगांच्या हौतात्म्याचे स्मरण ठेऊन जे कोणी दुकान बंद ठेवणार नाहीत त्याकाळी त्यांनाही धमकावण्यात येऊ लागले. म्हणून गांधीजी म्हणतात की, भगतसिंगांचा आत्मा कानपूरमधील घटना पाहत असेल तर त्याला प्रचंड दुःख आणि त्याला वेदना होत असतील आणि कदाचित या कृत्याचा त्याला लाजही वाटेत असेल. मी हे सांगतो कारण मला माहिती आहे की, भगतसिंग ही त्यांच्या भूमिकेवर ठाम होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com