
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या मयत विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. ए. पत्रावाले यांनी जामीन मंजूर केला. गुन्ह्यात साक्षी हिचा देखील सहभाग असल्याचा आरोप तिच्यावर आहे. गुन्हा घडल्यानंतर मागील सात महिन्यांपासून ती तुरूंगात होती.