मुस्लिम बांधवांनो 'या' आहेत 'बकरी ईद' साठीच्या सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना

सिद्धेश्वर डुकरे
Friday, 17 July 2020

मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी - गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : कोविडमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साध्या पदध्तीने साजरी करावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक महत्त्वाची  बैठक महत्त्वाची  संपन्न झाली होती. त्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरलंय. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

BIG NEWS - आधी स्वतःचं चित्र रेखाटलं, त्यावर हार घातला आणि लिहिली स्वतःच्याच मृत्यूची तारीख..  'त्या' तारखेला...
 

या आहेत मार्गदर्शक सूचना

  • कोविड मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
  • सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
  • नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
  • प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये *बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

मुंबईच्या इंट्रेस्टिंग बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

  • बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी  गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
  • कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
  • तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

( संकलन - सुमित बागुल )

bakara eid eid al adha edi ul zuha celebration guidelines by anil deshmukh

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bakara eid eid al adha edi ul zuha celebration guidelines by anil deshmukh