esakal | बकरी ईद: 300 जनावरांच्या कत्तलीला मुंबई पालिकेची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-High-Court-Bakri-Eid

बकरी ईद: 300 जनावरांच्या कत्तलीला मुंबई पालिकेची परवानगी

sakal_logo
By
विराज भागवत

लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत- मुंबई हायकोर्ट

मुंबई: राज्यात बकरी ईदचा उत्साह मुस्लिम जनतेत दिसत असतानाच कोविडच्या संकटामुळे सणांवर बंधने आली आहेत. मुंबईतील मुस्लिम जनतेची संख्या पाहता दिवसाला 300 मोठ्या जनावरांची कत्तल करण्याची परवानगी मुंबई पालिकेने देवनार कत्तलखान्याला दिली आहे. या निर्णयाविरोधात काही लोकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पालिकेने दिलेली संख्या ही एक हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असं मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले आणि पालिकेचाच निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले. (Bakri Eid Mumbai High Court Backs BMC Guidelines and slams Petition demanding more number of killings of Animals)

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

पालिकेकडून बकरी ईदसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. त्या नियमावलीनुसार, देवनार येथील कत्तलखाना हा बकरी ईदच्या कत्तलीच्या अनुषंगाने तीन दिवस सुरू ठेवण्यास पालिकेची परवानगी आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत लहानमोठ्या जनावरांची कत्तल या कत्तलखान्यात करता येऊ शकते. त्यानंतर मात्र कत्तलीला परवानगी नसेल. तसेच, मुस्लिमांची शहरातील संख्या लक्षात घेता दिवसाला हजार जनावरांची कत्तल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लिम नागरिक करत होते. पण दिवसाला 300 मोठ्या जनावरांचीच कत्तल करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे.

हेही वाचा: "त्यात काय मोठा पराक्रम?"; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

हायकोर्टाने काय सुनावलं...

बकरी ईदनिमित्त कोरोनाकाळात महापालिकेने देवनारमध्ये कुर्बानीसाठी बनवलेली नियमावली ही योग्यच आहे. याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यात येणार नाही. मर्यादित संख्येपेक्षा जास्त जनावरांच्या कत्तलीस परवानगी नाकारली जात आहे. कारण लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

loading image