esakal | "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

"हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

sakal_logo
By
विराज भागवत

मनसेकडून उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. "पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे", असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं. मुख्यमंत्री स्वत: काल कार ड्राईव्ह करून पंढरपूरला गेले आणि त्यांनी आज पूजाविधी केले. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र खोचक टोला लगावला. (Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande Sarcastically trolls CM Uddhav Thackeray over Ashadhi Ekadashi)

हेही वाचा: Ashadhi Ekadashi: विरारच्या कौशिकने साकारला अनोखा पांडुरंग

उद्धव ठाकरे विठ्ठलाच्या पुजेला निघाले तेव्हा अनेक माध्यमांनी ते स्वत: कार चालवत निघाल्याचे दाखवलं. ते आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हे दोघे लँड रोव्हरने पंढरपूरला पोहोचले. याच मुद्द्यावरून मनसेने खोचक ट्वीट केले. "हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग... पांडुरंग..", असं टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

हेही वाचा: पॉर्न फिल्म्स प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक!

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाची पूजा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पाहायचे आहे. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले आहे. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा मला विश्वास आहे."

loading image