Balasaheb Thackeray Birth Centenary
esakal
MNS chief Raj Thackeray posts an emotional tribute : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज १००वी जयंती आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray’s Post On Balasaheb Thackeray ) यांनी सोशल मीडियावर भाविनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी एक सूचक विधानही केलं आहे. राजकारणात घेतलेली लवचिक भूमिका ही स्वार्थासाठी नसून मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, असं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी या पोस्टमध्ये मराठीसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, ''बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं.''