बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया: अजित पवार

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया: अजित पवार

मुंबईः : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच कोरोनाव्हायसरचा संसर्ग सुरु असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 11.30 वाजता सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साडेअकराच्या सुमारास शिवतीर्थावर येऊन आदरांजली वाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित राहाणार आहेत. 

Balasaheb Thackeray death anniversary Deputy Chief Minister Ajit Pawar Tribute him

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com