फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात वयोवृद्धांसह दोघांवर प्राणघातक हल्ला 

फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात वयोवृद्धांसह दोघांवर प्राणघातक हल्ला 

मुंबईः  घरासमोर फटाके वाजवू नका असा मज्जाव केल्याचा राग मनात धरून दोघांनी वयोवृद्धांसह दोघांवर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्या प्रकरणी दोघांवर पोलिस ठाण्यात जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना जोगेश्वरी परिसरात अटक केली. त्यांना वांद्रे न्यायालयात नेले असता पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली.

अटकेत असलेला आरोपी उत्तम ऊर्फ जगदीश विठ्ठल सोनावणे (42) आणि विठ्ठल शिवराम सोनावणे (68)यांचा समावेश असून सदरची हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली.  शुक्रवारी 13 नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता जोगेश्‍वरीतील लिंक रोड, आनंदनगर, जय बजरंग चाळीत घडली. याच चाळीत अशोक आणि उत्तम सोनावणे यांचे कुटुंबीय राहत असून या दोन्ही कुटुंबात काही दिवसांपासून वाद होता. शुक्रवारी रात्री फटाके फोडण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून उत्तम आणि त्याचे वडिल विठ्ठल सोनावणे यांनी तक्रारदार अशोक दशरथ सोनावणे आणि त्याचे वडिल दशरथ सोनावणे यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अशोक सोनावणे याने दिलेल्या तक्रारीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध 307, 504, 34 भादवी सहकलम 37 (1), 135 मपोका कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला,शुक्रवारी 13 नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता जोगेश्‍वरीतील लिंक रोड, आनंदनगर, जय बजरंग चाळीत घडली. याच चाळीत अशोक आणि उत्तम सोनावणे यांचे कुटुंबिय राहत असून या दोन्ही कुटुंबात काही दिवसांपासून वाद होता. शुक्रवारी रात्री फटाके फोडण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने या दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सावंत हे करताहेत.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Four persons attacked two accused dispute in Andheri

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com