Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, एकाच रात्रीत सहा वेळा संशयास्पद व्यवहार; परदेशातून घडली घटना

Aaishvary Thackeray Cyber ​​Fraud: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Aaishvary Thackeray Cyber ​​Fraud

Aaishvary Thackeray Cyber ​​Fraud

ESakal

Updated on: 

मुंबई : राज्यभरात सायबर फसवणुकीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असतात. फसवणुकीचे जाळे पसरत असताना या जाळ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बॉलिवूड अभिनेता ऐश्वर्य ठाकरे अडकल्याची माहिती समोर आली आहे. सायबर भामट्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. एकाच रात्रीत सहा वेळा संशयास्पद व्यवहार करत खात्यातून १९,०१५ रुपये डेबिट झाले असून विशेषत: हे सर्व व्यवहार परदेशातून झाले आहेत.

Loading content, please wait...