
Ghodbunder Traffic Jam
ESakal
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीतून आता लवकरच सुटका होण्याची चिन्हे आहेत. या रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बाळकुम ते गायमुख या खाडीकिनारी पर्यायी मार्गाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, ज्यात प्रदूषण विभाग, वन विभाग, सीआरझेड, वायुदल आणि केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानग्यांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेने ही माहिती उच्च न्यायालयासमोर सादर केली असून, न्यायालयाकडून प्रकल्पास हिरवा कंदील मिळताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.