

Watchdog Foundation Alleges Unauthorized Commercial Use of a BEST Bus Stop on Hill Road, Bandra West
esakal
मुंबई, : वांद्रे (पश्चिम) येथील गजबजलेल्या हिल रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील बेस्ट बस थांब्याच्या जागेवर फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने अनधिकृत ताबा मिळवून दुकान सुरू केल्याचा गंभीर आरोप 'वॉचडॉग फाउंडेशन'ने केला आहे. याप्रकरणी बेस्ट प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, या ठिकाणाची तत्काळ पाहणी करून बेकायदा व्यावसायिक वापर थांबवण्याची मागणी करण्यात आली.