वांद्रे,धारावीत पाणी कपात; बीकेसी कलानगरमध्ये मंगळवारी कमी दाबाने पाणी

समीर सुर्वे
Saturday, 3 October 2020

मंगळवारी धारावी येथील जस्मीन मील रोड, माटूंगा लेबर कॅम्प या भागात पाणी पुरवठा होणार नाही.

मुंबई : वांद्रे येथील मुख्य जलवाहीनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे वांद्रे धारावी परीसरातील काही भागात सोमवार आणि मंगळवारी 50 टक्के पाणी कपात होणार आहे. तर काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. वांद्रे कुर्ला संकुल आणि कलानगर परीसरात मंगळवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

वांद्रे पुर्वे येथील 48 इंच जलवाहीनीच्या दुरुस्तीचे काम 5 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार असून 6 ऑक्‍टोबर दुपारी 12 वाजे पर्यंत हे काम सुरु राहाणार आहे. या काळात वांद्रे आणि धारावीतील पाणी पुरवठ्यावर परीणाम होणार आहे. सोमवारी धारावी येथील धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए.के.जी नगर रोड, कुंभारवाडा,संत गोरा कुंभार रोड, दिलीप कदम मार्ग या भागात 50 टक्के कमी पाणी पुरवठा होईल. तर, याच दिवशी वांद्रे पुर्व येथील वांद्रे टर्मिनस परीसर आणि वांद्रे रेल्वे वसाहतीत पाणी पुरवठा होणार नाही.

महत्त्वाची बातमी: सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

मंगळवारी धारावी येथील जस्मीन मील रोड, माटूंगा लेबर कॅम्प या भागात पाणी पुरवठा होणार नाही. तर वांद्रे येथील नवपाडा, निर्मलनगर, बेहरामपाडा, शांतीलाल कंपाऊंड, कला नगर, गोळीबार रोड, बीकेसी या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

bandra dharavi to face water cut bkc and kalanagar to get water with low pressure


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bandra dharavi to face water cut bkc and kalanagar to get water with low pressure