Ulhasnagar News : व्हिजासाठी आला आणि जाळ्यात अडकला; बांगलादेशी नागरिकाचा पर्दाफाश, पासपोर्ट जप्त

व्हिजा पडताळणीसाठी आलेला नागरिक बांगलादेशी असल्याचा पर्दाफाश
Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crimesakal
Updated on

उल्हासनगर - व्हिजा पडताळणीसाठी आलेला नागरिक बांगलादेशी असल्याचा पर्दाफाश उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या मास्टरमाइंड कामगिरीमूळे उघड झाला आहे.

जोरुल मोहम्मद शेख हा उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या जवळ राहतो.जोरुल यांच्याकडे पासपोर्ट असून त्याला कुवैतला जायचे असल्याने तो व्हिजा पडताळणीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील गोपनीय कक्षात आला होता. त्यावेळी पोलीस हवालदार महेंद्र भोई यांनी जोरुल याचे कागदपत्र तपासले असता त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवर भोई यांना संशय आला. त्या सर्व कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आल्यावर कागदपत्रे बोगस असल्याचा प्रकार समोर आला.

त्याचवेळी मोठ्या चलाखीने गोपनीय पथकाचे पोलिस हवालदार महेंद्र भोई, दिनेश शिर्के,चेतन खांबेकर आणि संतोष कुर्ले यांनी जोरुल मोहम्मद शेख यांच्याकडील मोबाईल तपासला असता जोरुल चक्क बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पण झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली.

जोरुल मोहम्मद शेख याच्याकडे बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचे मिळून आले आहेत. तो अनधिकृतपणे पारपत्र व व्हिसा मिळवून वास्तव्य करत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध पासपोर्ट अधिनियम, विदेशी व्यक्ती अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून, पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायलयात हजर केले असता 20 फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली असून त्यांनी गोपनीय पोलिसांना शाबासकी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com