बँकेचे एटीएम लुटायला आलेल्या टोळक्याला पोलिसांनी केले जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दिवाळीच्या सणादिवशी बँक ऑफ बडोदा बँकेचे एटीएम लुटण्याचा कट रचणाऱ्या टोळीतील दोन गुन्हेगारांना मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

बँकेचे एटीएम लुटायला आलेल्या टोळक्याला पोलिसांनी केले जेरबंद

मुंबई - दिवाळीच्या सणादिवशी बँक ऑफ बडोदा बँकेचे एटीएम लुटण्याचा कट रचणाऱ्या टोळीतील दोन गुन्हेगारांना मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दरोड्याची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळ्या दिवाळीत बंद असलेल्या घरांना लक्ष्य करत असल्याची माहिती मिळत आहे. अटक करण्यात आलेले दोंघावर व त्यांच्या टोळीवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत.

प्रकरण काय

22 ऑक्टोबर रोजी बोरीवलीच्या हद्दीत काही इसम लुटमारीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली होती. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी माहिती मिळताच त्याप्रमाणे घटनास्थळी सापळा रचला. मात्र रात्रभर वाट पाहिल्यानंतरही कोणीच न आल्यामुळे पोलीस परत होते, तेव्हा वाटेत बँक ऑफ बडोदाच्या एटीएमभोवती 5 व्यक्ती एकत्र संशयास्पदरीत्या दिसले.

कस्तुरबा पोलिसांचे पथकाने त्या इसामांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यातले काही पळून जाऊ लागले. हे लोक लुटण्याच्या उद्देशाने आले असल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून अनेक लुटमार करण्यासाठी आणलेली हत्यारे जप्त केली. तपासात ही टोळी बँक ऑफ बडोदाचे एटीएम लुटण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले मात्र त्यांना वेळीच अटक करण्यात आली. प्रत्यक्षात ही टोळीचे टार्गेट दिवाळीच्या सुट्टीत बंद असलेली घरे होती. मात्र घरफोडी करण्यास यश न मिळाल्यामुळे त्यांनी बँकांना टार्गेट करत एटीएम गाठले. त्यांच्यावर मुंबई आणि मुंबईबाहेर डझनभर गुन्हे दाखल आहेत.