

Maharashtra Loan Waiver Delayed For Farmers As Incorrect Bank Data Leaves 9 Lakh 43 Thousand Farmers Waiting For Relief
sakal
मुंबई: बँकांनी भरलेल्या चुकीच्या माहितीमुळे ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. बँकांनी वेळेत माहिती न दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता धूसर आहे. गणेशोत्सवातील सुट्ट्यांमुळे कर्जखात्यांची अद्ययावत माहिती भरण्यास विलंब होऊ शकतो, असे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.