esakal | धक्कादायक! बँकेने गोठवले 'या' महाविद्यालयाचे खाते; प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अडचण..

बोलून बातमी शोधा

sidharth vidhi university

गोरगरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा प्रश्न मुंबई विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून रखडवला आहे.

धक्कादायक! बँकेने गोठवले 'या' महाविद्यालयाचे खाते; प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अडचण..
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : गोरगरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा प्रश्न मुंबई विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून रखडवला आहे. यामुळे बँकेने महाविद्यालयाचे बँक खाते गोठवले असल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे बंद झाले आहे. 

यातच द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही अडचणीत येऊ लागल्या आहेत. या प्रश्नी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: 1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेतील राजकारणामुळे सिद्धार्थ महाविद्यालय सतत चर्चेत असते. अंतर्गत राजकारणामुळे महाविद्यालयाचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे. यातच मुंबई विद्यापीठाकडून सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य नियुक्तीचा निर्णय मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे. 

त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. प्राचार्य नियुक्तीसाठी विद्यापीठाने 3 सदस्यांची समिती गठित केली. परंतु अद्याप समितीने याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याचा आरोप सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केला आहे. पंधरा दिवसात समिती अहवाल सादर करेल असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. 

परंतु एक वर्षांपासून अधिक कालावधी होऊनही समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही. यामुळे प्रभारी प्राचार्य पदाला विद्यापीठाची मान्यता नसल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही.

प्रभारी प्राचार्य पदाची नियुक्ती प्रलंबित असल्याने बँकेने विद्यापीठाकडे याबाबत विचारणा केली. परंतु विद्यापीठाकडून ठोस उत्तर न मिळाल्याने बँकेने महाविद्यालयाचे अकाउंट गोठवले आहे. यामुळे महाविद्यालयाला द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था संकटात आली आहे. 

हेही वाचा: सुशांतच्या आत्महत्येस कारण की... काय म्हणताहेत संजय राऊत, वाचा

या महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती थोरात यांनी उदय सामंत यांच्याकडे केली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

bank freeze account of this university in mumbai read full story