1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

मुंबई : कोरोना व्हायरसनं मुंबईसह राज्यात कहर केला आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच मुंबईला पूर्वपदावर आणण्याचं काम हळूहळू ठाकरे सरकार करत आहे. तसंच आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ठाकरे सरकारकडून अनलॉक 2 ची तयारी सुरु करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती लक्षात घेत सरकारनं चार टप्प्यांच्या कडक लॉकडाऊननंतर नियमांमध्ये शिथिलता आणत पहिल्या अनलॉकचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अनलॉक-1 च्या प्रक्रियेनंतर आता अनलॉक-2 बाबतही विचार सुरू आहे. 

अनलॉक 2 च्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या आढावा घेत असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी ते चर्चा करताहेत. यावेळी टप्प्याटप्यानं सर्व काही पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करेल असं म्हटलं जात आहे. राज्यातले काही जिल्हे पूर्वपदावर आले असले तरी महामुंबईतील महानगरपालिकांसह राज्यातील काही महानगरपालिका भाग आजही कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहेत. 

अनलॉक-2 असा असण्याची शक्यता 

येत्या 1 जुलैपासून एसटी बस, रिक्षा, टॅक्सी यासारखी सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेले अनेक महिने जिल्ह्याअंतर्गत अडकलेले किंवा रोजगारासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी एसटी सुरु करण्याचा विचार सरकार करेल.  मुंबईतील अनेक कॉर्पोरेट कॅपन्यां हळूहळू सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसेसचा वापर करावा लागतो. पण बसेसची संख्या पाहता कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सम विषम नंबर प्लेट प्रमाणात रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर उतरवू शकतो का यांवर सध्या विचार सुरु आहे.

याव्यतिरिक्त कंपन्या बाहेरील काही हॉटेल खानावळ उघडण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होऊ शकतो.

शाळा सुरु होणार?

जुलै महिन्यापासून रेड झोन नसलेल्या भागात नववी, दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत विचार सुरु आहेत. तसेच जुलैमध्ये दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही सुरु केल्या जाऊ शकतात. ज्या ठिकाणी शाळा सुरु करणे शक्य नाही, तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्यात येईल. तसंच  6 वी ते 8 वी ऑगस्टपासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com