सुटकेसमध्ये तुकडे करुन भरलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी अवघ्या ८ तासात लावला छडा

सुटकेसमध्ये तुकडे करुन भरलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी अवघ्या ८ तासात लावला छडा

मुंबईः  नेरळमध्ये मध्य रेल्वे कारशेडच्या कुंपणात एक मृतदेह आढळून आला होता. सुटकेसमध्ये तुकडे केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र आता अवघ्या 24 तासात रायगड पोलिसांच्या टीमने आरोपींना अटक केली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपींची सध्या कसून चौकशी केली जात आहे. गुन्ह्यातील संबंधित आरोपी चार्स नाडार आणि पत्नी हिला मुंबई-मीरा रोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नेमकं प्रकरण काय?

नेरळ रेल्वे स्थानक परिसरात नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या मृतदेहाचे तुकडे करून या सुटकेसमध्ये भरण्यात आले होते. सुरुवातीला या मृतदेहाचे डोके सापडल नसल्यानं मृत व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना खूप अडचणी येत होत्या. मात्र त्यानंतर मृत व्यक्तीचे डोके हे उशिरा नेरळ पूर्व भागातील नाल्यात सापडलं. त्यानंतर पोलिस तपासाला वेग आला होता. 

यावेळी आरोपीने मृत व्यक्तीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तसेच सुटकेस आणि मद्यपी द्रव हे नेरळमधल्या बाजारातून नेले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागण्यास पोलिसांना मदत झाली. नेरळ बाजारपेठ आणि राजबाग सोसायटीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यानं तपासात फार मोठा उपयोग झाला.

तपास केल्यानंतर आरोपी पती पत्नी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी नेरळ येथील राजबाग येथील गृहप्रकल्पात गेली दोन वर्षे भाडे तत्वावर राहत होते. आरोपींनी मृत व्यक्तीची हत्या करुन त्याचे तुकडे हे सुटकेसमध्ये भरले. हत्या केल्यानंतरचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या माहितीच्या आधारावर नेरळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. मृत व्यक्ती हा वरळी पोलिस ठाणे हद्दीत राहणारा असून त्याचे नाव सुशीलकुमार मारुती सरनाईक असल्याचं समजतंय.

मृत सुशीलकुमार यांची ओळख आरोपी नाडार यांच्या पत्नीची भेट सोशल मीडियावर झाली होती. यातच सरनाईक नेरळ येथे  भेटण्यासाठी येत होता. सरनाईक यांची हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली हे अद्याप समोर आले नसून नेरळ पोलिस अधिक तपास घेत आहेत.

या प्रकरणात कर्जतचे पोलिस उपअधीक्षक अनिल घेर्डीकर यांनी नेरळ-माथेरान आणि कर्जत येथील पोलिस ठाण्याची  एक टीम तयार केली होती.  तर अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण ला देखील बोलावण्यात आले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ शहरात सर्व स्थरातून कैतुक होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे देखील घटनास्थळी हजार झाले होते.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

bank official Sushilkumar sarnaik body chopped 12 pieces packed two suitcases raigad

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com