
डोंबिवली : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू असतानाच हे राजकारणी शहरातील एकही जागा सोडायला तयार नाही असेच दिसत आहेत. कल्याण शीळ रोडवरील डिव्हायडरवरील जागा ही बॅनरने गिळंकृत केली आहे. डिव्हायडर मध्ये सुशोभीकरणसाठी लावण्यात आलेल्या वस्तूंवर बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील बेकायदा फलकांवर पालिका प्रशासनाकडून जोरदार कारवाई होत असतानाच, सत्ताधारी पक्षाच्या बॅनरला मात्र अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे.