मुंबई : नौदलाने जहाजावर अडकलेल्या १७७ जणांची केली सुटका

निवासासाठी 'P305’ या बार्जचा वापर करण्यात येत होता.
sea
sea
Updated on

मुंबई: अरबी समुद्रात (arbian sea) एक मोठी बचाव मोहिम (rescue operation) सुरु आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले ‘P305’बार्ज हे जहाज बुडाल्याचे (Barge sinks) मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. मुंबई हाय (Bombay high) जवळच्या समुद्रात ही घटना घडली आहे. सकाळी ७.३० वाजेपर्यंत नौदलाने जहाजावरील २७३ जणांपैकी १७७ जणांची सुटका केली. खोल समुद्रात प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी 'P305’ या बार्जचा वापर करण्यात येत होता. सोमवारी दुपारी १ वाजता ही बचाव मोहिम सुरु झाली. जी रात्रभर सुरु होती. (Barge sinks off Bombay high over 125 still missing)

बचाव मोहिमेसाठी नौदलाने मंगळवारी बोईंग P8I विमानाचा वापर केला. समुद्रातील अत्यंत छोट्यातील छोटी गोष्ट हेरण्यामध्ये या विमानाचे सेन्सर्स सक्षम आहेत. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी भारतीय नौदलाने सीकिंग ४२ हेलिकॉप्टरचा सुद्धा वापर केला. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून परिस्थिती अजूनही धोकादायक आहे. आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता ही दोन जहाज घटनास्थळी बचाव मोहिम राबवत आहेत.

sea
BMC चा मुंबईकरांसाठी १ कोटी लस विकत घेण्याचा प्लान फसणार?

एनर्जी स्टार आणि ग्रेट शीप अहाल्या ही जहाजे सुद्धा बचाव मोहिमेत सहभागी झाली आहेत. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 'P305’ हे बार्ज अरबी समुद्रात तैनात केले होते.

sea
ऑक्सिजन वाहतूक करणारे टँकर चालक पळून जाण्याची शक्यता कारण....

‘जीएएल कन्स्ट्रक्टर’ हे दुसरेही जहाज समुद्रात बंद पडून भरकटल्याचा संदेश नौदलाला मिळाल्यानंतर त्याच्या मदतीसाठी आयएनएस तलवार ही युद्धनौका संध्याकाळी नौदल गोदीतून निघाली. या जहाजावर १३७ खलाशी आहेत. भरकटलेल्या जहाजांपैकी ‘पी ३०५’ जहाज मुंबई हायमधील हिरा तेल उत्खनन विहिरींच्या दिशेने भरकटत गेल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com