BMC चा मुंबईकरांसाठी १ कोटी लस विकत घेण्याचा प्लान फसणार?

काय आहे कारण....
covid vaccine
covid vaccineGoogle file photo

मुंबई: कोविड लशीचे (covid vaccine) एक कोटी डोस (BMC vaccine tenders) विकत घेण्यासाठी महानगर पालिकेने मागच्या आठवड्यात जागतिक निविदा जाहीर केल्या. पण अद्यापपर्यंत कुठल्याही लस उत्पादक कंपनीने या निविदांना प्रतिसाद दिलेला नाही. या निविदांना लस उत्पादक (vaccine makers) कंपनीकडून प्रतिसाद मिळेल, यासाठी मुंबई महापालिका आणखी आठवड्याभरासाठी मुदत वाढवू शकते. राज्य सरकारडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर २४ तासात अत्यंत वेगवान पद्धतीने या निविदा काढण्यात आल्या. (BMC vaccine tenders to extend vax EoI by week)

अद्यापपर्यंत कोणीही निविदा भरलेली नाही. त्यामुळे आम्ही मंगळवार संध्याकाळपर्यंत थांबू. कारण निविदा भरण्याची अंतिम मुदत मंगळवारपर्यंत आहे. कुठल्याही लस उत्पादकाने प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही आणखी आठवड्याभरासाठी मुदत वाढवू, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले.

covid vaccine
मुंबईत आज सुरु होणार लसीकरण

संबंधित कंपनीला लस पुरवठा करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तीन आठवड्याच्या आत पुरवठा सुरु करणे बंधनकारक आहे. मुदतीत पुरवठा न झाल्यास अथवा मध्येच पुरवठा थांबल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे, असे या निविदा पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

covid vaccine
मुंबईत म्युकर मायकोसिसमुळे पहिला मृत्यू

सध्या मुंबईत (BMC) लसींचा तुटवडा (vaccine shortage) जाणवत आहे. नागरिक लस केंद्रांवर येतात. पण विनालस त्यांना माघारी परतावे लागते. मुंबईत कुठलाही नागरिक लसीपासून वंचित राहू नये, त्यांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेची लस खरेदीची योजना आहे. मुंबई महापालिका या लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये (vaccine spending) खर्च करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com