मुंबईत आता रात्री 11.30 पर्यंत बार, हॉटेल्स सुरु राहणार

समीर सुर्वे
Friday, 16 October 2020

 मुंबई शहरातील फुडकोर्ट, उपहारगृह आणि बार रात्री 11.30  वाजेपर्यंत तर मंडया आणि इतर दुकाने रात्री 9 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी गुरुवारी मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबईः सध्या मुंबईत लॉकडाऊननंतर आता अनलॉकला सुरुवात झाली आहे.  संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेल्या दुकानांची वेळ अडीच तासांनी वाढवण्यात आली आहे.  मुंबई शहरातील फुडकोर्ट, उपहारगृह आणि बार रात्री 11.30  वाजेपर्यंत तर मंडया आणि इतर दुकाने रात्री 9 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी गुरुवारी मुंबई महापालिकेने दिली आहे. तसे परिपत्रकच प्रसिध्द करण्यात आले असून आजपासूनच त्याची अमंलबजावणी होणार आहे.

मुंबईतील दुकाने, मंडया, मॉल्स सुरु करण्याची परवानगी महापालिकेने या पूर्वीच दिली आहे. मात्र,संध्याकाळी 7 वाजे पर्यंतच त्यांना व्यवसाय करता येत होता. मात्र,त्यामुळे व्यवसाय होत नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली होती. त्यावर पालिकेने गुरुवारी दुकाने, मंड्या तसेच इतर व्यापारी आस्थापने रात्री 9 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत.

अधिक वाचाः  Viral Video: 22 व्या मजल्यावरुन स्टंट करणारा तरुण अटके

त्याच बरोबर फुडकोर्ट, उपहारगृह आणि बार रात्री 11:30 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र,33 टक्के ग्राहकांच्या परवानगीचा नियम कायम आहे.

प्रतिबंधित क्षेत्र, सिल इमारतीत असलेल्या व्यवसायांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत 600 हून अधिक प्रतिबंधित क्षेत्र 9 हजारहून अधिक सिल इमारती आहेत.  5 ऑक्टोबरपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना एकूण क्षमतेच्या 33 टक्के सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ते सकाळी 7 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. 

तर फौजदारी कारवाई 

साथ नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियमबाह्य वेळेत व्यवसाय सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यात फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई असेल असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Bars and hotels will be open in Mumbai till 11.30 pm


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bars and hotels will be open in Mumbai till 11.30 pm