

Barvi Dam Water Shutdown Cancelled
ESakal
कल्याण-डोंबिवली: ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी बारवी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी नियोजित केलेला शटडाऊन तूर्तास रद्द केला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, ३ डिसेंबरपासून दर गुरुवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे.