Thane News: दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावली होती, अचानक झाला स्फोट, अन् मायलेकी...
Mumbra: मुंब्र्यात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाणे : घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मुंब्र्यातील अल्मास कॉलनी येथे घडली. या घटनेत नुसरत सय्यद (४५) या आईसह तिच्या मुली हफजा (२४) आणि अफजा (१८) अशा मायलेकी जखमी झाल्या आहेत.