KEMमध्ये बीसीजी लसीचा टप्पा पूर्ण, 109 ज्येष्ठ नागरिकांना यशस्वी डोस

भाग्यश्री भुवड
Thursday, 3 December 2020

कोरोनावर मात करणारी लस येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच केईएम रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस आणि कोविशिल्ड देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. केईएम रुग्णालयात 109 ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्यात आली असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले. 

मुंबई: कोरोनावर मात करणारी लस येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच केईएम रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस आणि कोविशिल्ड देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. केईएम रुग्णालयात 109 ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्यात आली असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले. 

ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्याआधी 384 ज्येष्ठ नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. यापैकी 109 ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्यात आली असून बीसीजी लस देण्याचा टप्पा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. केईएम आणि वैद्यकीय रुग्णालयात ही लस दिली. ज्या ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली आहे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे. 

कोरोना विरोधात शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी बीसीजी लसीकरणाचा प्रयोग महापालिकेच्या केईएम रुग्णालयात करण्यात आला. ही लस छातीतील संसर्ग प्रतिबंधित करत असून कोरोना छातीतील संसर्ग असल्याने ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासाठी कितपत फायदेशीर होईल याची चाचणी केली जात आहे. केईएम रुग्णालयात बीसीजी लसीच्या प्रयोगाला ऑगस्ट महिन्यात सुरुवात झाली. आतापर्यंत 109 जणांना बीसीजी लस देण्यात आली आहे. 60 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात आली. 

अधिक वाचा- योगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक

कोरोनाची लागण बालक आणि वयोवृद्ध व्यक्तींना होते. तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचेच होत असल्याचे समोर आले आहे. बीसीजी लस लहान बालकांचे क्षयरोगापासून रक्षण करते, तर कोरोना विषाणू विरोधात ही लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना संकटसमयी बीसीजी लस वृद्धांसाठी उपयुक्त ठरत असल्याने ही लस देण्यात आल्याचे ते म्हणाले. ही लस दिल्यामुळे कोरोनाची शक्यता, गांभीर्य आणि मृत्यूदर कमी करता येत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. पालिकेचे केईएम रुग्णालय आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने मिळून हे संशोधन केल्याने ही लस वृद्धांना देण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BCG vaccination phase completed in KEM successful dose 109 senior citizens


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCG vaccination phase completed in KEM successful dose 109 senior citizens