योगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक

योगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणारेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यावरुन राजकारण तापलं आहे. यावरुन आता विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. बॉलिवूडच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर फिल्म इंडस्ट्री उभारण्याची योजना असून यावरुनच आता राजकारणही तापले आहे. 

काय म्हणाले नवाब मलिक 

प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यामध्ये उद्योगीकरणासाठी मुंबईतल्या लोकांना गुंतवणूकीसाठी मुंबईत येऊन त्यांच्या भेटीगाठी घेत असतात.  सेमीनार घेत असतात. लोकांना भेटत असतात. योगी आदित्यनाथ आले हे काही नवीन नाही. याआधी सुद्धा वेगवेगळे मुख्यमंत्री येऊन गेले.

आता विषय आहे बॉलिवूडच्या बाबतीतला, त्यांना उत्तर प्रदेशमध्ये फिल्मनगरी सुरु करायची आहे. इतर राज्यांमध्येही फिल्म नगरी तयार झाली. ते करत असताना भोजपुरी सिनेमांना प्रोत्साहन देणं पहिलं गरजेचं आहे. तिथे त्यांना पैसे दिले पाहिजे. भोजपुरी सिनेमाचाही एक मोठा वर्ग आहे. जर त्यांना वाटत असेल बॉलिवूड संपून उत्तर प्रदेशमध्ये हा सगळा फिल्मशी संबंधित उद्योग जाईल. तर ते चुकीचं आहे, असं होतं नाही.  

इतर राज्यांमध्येही लोकांनी फिल्म नगरी तयार  केली. पण १०० वर्षांपेक्षा जास्त बॉलिवूडला इतिहास आहे. ते संपून फिल्मनगरी कुठे जाईल तर तो समज गैरसमज आहे. ते मुंबईत आले ते काही नवीन नाही. असे अनेक राज्यातील मुख्यमंत्री येत असतात. आर्थिक राजधानीचा दर्जा असताना मुंबईला आल्याशिवाय कोणाचे काम चालत नाही.

भोजपुरी सिनेमाला बघणाराही एक मोठा वर्ग आहे. त्याचेही कलावंत आहेत. त्यासाठी त्यांनी काही करुन दाखवलं तर किंवा त्यांना काही तरी आधार दिला तर चांगलं होईल. जर त्यांची बॉलिवूड तिथे शिफ्ट करायची ताकद असेल. पण अर्थव्यवस्था कोणी थांबवत नाही आणि कोणामुळे चालत नाही. कोणतंही सेक्टर असेल ते कोणी थांबवू शकत नाही आणि स्वतःकडे घेऊ शकत नाही. बॉलिवूडची वेगळी संस्कृती आहे. मुंबईमधून बॉलिवूड कोठे जाईल, असे ज्याचा समज असेल तो गैरसमज आहे. 

NCP chief spokesperson Nawab Malik criticizes Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com