BCOM: 'बँकिंग अँड इन्शुरन्स' सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर

97.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Result
Resultsakal media

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या अंतिम वर्षाच्या मे 2021 मध्ये ऑनलाईन पद्धतीने (online exam) घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचा बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र-6 (bcom banking insurance result) या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत 97.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण (student pass) झाले आहेत. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

या परीक्षेत एकूण 4 हजार 897 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 739 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर 9 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होता. तसेच या परीक्षेत 124 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, विद्यापीठाने आजपर्यंत 2021 च्या उन्हाळी सत्राचे 145 निकाल जाहीर केले आहेत. काल विद्यापीठाने विविध परीक्षांचे 10 निकाल जाहीर केले आहेत.

Result
वंचितांना 'गोदरेज' कंपनीने केले प्रशिक्षित, तर ३५ लाख लोकांना आरोग्यसेवा

बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र 6 समवेत बीकॉम फायनान्शियल मार्केट्स सत्र 5, बीई केमिकल इंजिनिअरिंग सत्र 7, बीई इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सत्र 7, बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सत्र 7, बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सत्र 7, बीई मेकॅट्रॉनिक्स सत्र 7, बीए (75:25) सत्र 5 व 6 व बीए कलीनरी आर्ट्स सत्र 6 असे दहा निकाल जाहीर केले आहेत. बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र-6 या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com