esakal | बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाचा नारळ फुटणार कधी ?
sakal

बोलून बातमी शोधा

bdd chawl

बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाचा नारळ फुटणार कधी ?

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : महाविकास आघाडीतील (MVA Government) नेते व्यस्त असल्याने बीडीडी चाळ (BDD) पुनर्विकासाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. वरळीतून (Worli) या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची (MVA Politician) वेळ निश्चित होत नसल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. यामुळे म्हाडाचे(MHADA) दररोज एक कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. (BDD Chaul Redevelopment Work still on waiting due To MVA government leaders busy schedule-nss91)

वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा 22 एप्रिल 2017 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाले. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम एल ऍण्ड टी कंपनीला दिले आहे. ना.म.जोशी मार्गावरील चाळींच्या पुनर्विकासाचे काम शहापूरजी ऍण्ड पालनजी आणि वरळी येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची निवड करण्यात आली आहे. भूमिपूजनानंतर गेली चार वर्ष पुनर्विकासाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे.

हेही वाचा: कोकणातील समुद्रात उसळणार लाटा, वेध शाळेने दिली 'ही' महत्वाची माहिती

वरळी येथून बीडीडी चाळ पुनर्विकासाला सुरुवात करण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. मात्र बांधकाम सुरू करण्यापूर्वी याचे उदघाटन महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. परंतु गेले काही महिन्यांपासून म्हाडा अधिकारी मंत्र्यांच्या वेळेची वाट पाहत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी सर्व साहित्य पोचले आहे. मात्र नेत्यांकडून कामाचे उदघाटन करण्यास वेळ नसल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. वरळीतील प्रकल्पाचे लवकर उदघाटन करावे, असा आमचा आग्रह आहे. रहिवासी म्हाडाला सहकार्य करत आहेत, असे अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी सांगितले.

loading image