esakal | कोकणातील समुद्रात उसळणार लाटा, वेध शाळेने दिली 'ही' महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

sea

कोकणातील समुद्रात उसळणार लाटा, वेध शाळेने दिली 'ही' महत्वाची माहिती

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : रवीवार मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण कोकण पट्टीच्या (Kokan Area) समुद्रात वाऱ्याचा वेग जास्त राहाणार असल्याने 3.5 ते 4.5 मिटरच्या लाटा (Sea Waves) उसळणार आहेत. असे वेधशाळेकडून (Observatory) जाहीर करण्यात आले आहे. तर,खबरदारीचा (Precautions) उपया म्हणून किनारपट्टी परिसरात सर्व यंत्रणा (Rescue Team) सज्ज असून नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन महापालिकेने (BMC) केले आहे. ( Sunday Big Waves in kokan sea observatory school information people be alert-nss91)

मुंबईला धारेवर धरणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली होती.दिवसभरात अधून मधून पावसाचा शिडकाव होत होता.तर,काही भागात पावसाची रिपरीप सुरु होती.रविवारीही पावसाची अशीच परीस्थीतीती राहाणार असून सोमवार पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.बुधवार पर्यंत संपुर्ण महामुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी 200 मि.मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यात रविवारी रेड अलर्ट असून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर,रायगड रत्नागिरी जिल्ह्यात रविवार पासूनच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा: Mumbai Police : गँगस्टर फहिम मचमचच्या हस्तकाला अटक

शुक्रवारी पहाटे झालेल्या तुफान पावसाने मुंबईची कोंडी केली होती.सकाळ नंतर पावसाचा जोर ओसरला.तर,शनिवारीही पावसाचा फारसा जोर नव्हता.अधून मधून मोठ्या सरी कोसळल्या.काही भागात अधून मधून पावसाचा शिडकाव झाला तर काही भागात रिपरीप सुरु होती.सर्वाधिक पावसाची नोंद राममंदिर रोड येथे 95.5 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.रविवारीही मुंबईसह ठाणे,पालघर जिल्ह्यात पावसाची परीस्थीती अशीच राहाणार आहे.सोमवार पासून पावसाचा जोर वाढणार असून बुधवार पर्यंत वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.मुंबईसह महामुंबईत या काळात मध्यम स्वरुपाचा पाऊस राहाणार असून काही भागात 200 मि.मी पावसाची शक्यता आहे.

कुलाबा येथे आज कमाल 31 अंश आणि किमान 25.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर,2.4 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. सांताक्रुझ येथे कमाल 29.7 किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंंद झाली तर 11.2 मिमी पाऊस नोंदविण्यात आला.रविवारीही अशीच परीस्थीती राहाणार आहे.

loading image